Monday, November 7, 2011

दूर देशी

दूर देशी माझ्या डोक्याशी


दोन मऊ ऊश्या असतात

बिस्तरा वर जाड गादी

वर नरम रजयी पण असते

तरी घरच्या जमीनी चा

कठोरपण जास्त आराम देतो

कारण तिथे तुझे बोट माझ्या केसां वर असतात

कारण इथे तुझी कुशी नसते.

दूर देशी इथे माझ्या खिडकीतून

सुंदर हिरवा डोंगर दिसतो

वरून उतरणारे वादळ दिसतात

छान हळूवार पाऊस येतो

पण तरी मुंबईचा घामाचा पाऊस

जास्त हवा हवा सा वाटतो

कारण तीथे तुझ्या केसांची सावली असते

कारण इथे तुझ्या श्वासांचा वारा नसतो.

मला तो तुझा स्पर्श

मला  ते तुझे शब्द पाहिजे परत

इथे चेहरे सुंदर असतील बहुदा

पण डोळे तुझ्यासारखे बोलके नाहीत

2 comments:

sid said...

This one is my most fav till now as its coming straight from the heart. I liked it from the start till the end. Can relate with your thoughts.

Trupti said...

mast re :)